👉नवीन कामगार कायद्यातून पत्रकाराना वगळले.
नवीन कामगार कायद्यावर हरकती नोंदवणार
👉 डॉ. विश्वासराव आरोटे यांनी घेतली आण्णाची भेट
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – पत्रकार संरक्षण कायद्याविषयी फार मोठा गवगवा झाला असला तरी कार्यवाही झालेली दिसत नाही, म्हणून सर्व माहीती घेऊन पत्रकार संरक्षण कायदयाविषयी पाठपुरावा करू असे ठोस आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्यासह शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी येथे अण्णांची भेट घेत पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या विविध समस्या बाबत चर्चा केली .
अण्णा हजारे यावेळी बोलताना म्हणाले की,पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपण सैदव तत्पर असून शासनाने याबाबत काय भूमिका घेतली, याचीही माहीती घेऊ. कारण लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणजे पत्रकार असतो मात्र शासन कर्त्याची मानसिकता चांगली असावी लागते पत्रकारांच्या कायद्याविषयी दुर्लक्ष करून शासन काय साध्य करणार असा सवाल करत अण्णा पुढे बोलताना म्हणाले की, वेळप्रसंगी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण अग्रभागी राहू असे ते म्हणाले.
डॉ . विश्वास आरोटे यावेळी अण्णाशी चर्चा करताना म्हणाले की, कोरोनाकाळामध्ये पत्रकारांनी जीव धोक्यात घालून साथरोग नियंत्रण करण्यासाठी प्रबोधन केले राज्यात सुमारे २४० पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला तत्कालिन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच देण्याचे जाहीर केले, मात्र ती घोषणा कागदावरच राहिली. त्या मयत पत्रकारांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या नवीन कामगार धोरणातून पत्रकाराना वगळले असून या कायदयावर हरकत घेणार असून अण्णा हजारेकडे पाठबळ देण्याची विनंती केली.
यावेळी राज्य पत्रकार संघाचे ब्रॅण्डअम्बेसेडर पत्रकार संजय फुलसुंदर ही उपस्थित होते .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी पत्रकार संरक्षण कायदयासंदर्भात पत्रकारांच्या समस्या व शासनाची दिरंगाई याबाबतची माहिती अण्णा हजारे यांना पुराव्यासह दिली. राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव राम तांबे यांनी आभार मानले.