संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका यांच्या वतीने मनोरुग्ण व्यक्तींना फराळ वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी केडगाव येथील मानव प्रकल्प व देहरे येथील मनगाव प्रकल्प या संस्थेत भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. केडगाव वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांच्या हस्ते या फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शशिकांत गिरी म्हणाले की नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे पत्रकार संघटनेकडून पोलीस आणि पत्रकार हा समन्वय राखत नेहमीच गरजवंतांना मदत केली जाते पोलीस आणि पत्रकार हे एका नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात दोघेही समाजाला मदत आणि प्रेरणा देण्याचे काम करत असतात. नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम समाजातील विविध प्रश्न सोडवणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत असे मत व्यक्त केले.
पत्रकार संघाचे नगर तालुका अध्यक्ष अन्सार शेख यांनी कार्यक्रमाची माहिती देत यापुढेही विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले
यावेळी पत्रकार संघटनेचे खजिनदार खासेराव साबळे, तालुका उपाध्यक्ष शिवा म्हस्के,सचिव सबील सय्यद, संजय वायकर ,महेंद्र भिंगारदिवे, अशोक तांबे, रफिक शेख ,बाबासाहेब तिपोळे, अमोल डोळस, श्याम कांबळे आदि उपस्थित होते.