👉मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात
👉सामाजिक विकासात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची -संभाजीराव लांगोरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – सामाजिक विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून ते प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी पत्रकारांनी सातत्यानेच भरीव काम केले आहे. पत्रकार सामाजिक कार्याला न्याय देऊ शकतो, असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी व्यक्त केले.

मराठी पत्रकार परिषदेतर्फे शहरात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लांगोरे बोलत होते. सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, मिनाताई मुनोत, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, जाहिरात संघटनेचे नितीन देशमुख, श्रीकांत मांढरे, प्रफुल्ल मुथ्था, अॅड. शिवाजी कराळे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुशील थोरात, दत्ता इंगळे, केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मन्यार आदी उपस्थित होते.
पुढे लांगोरे म्हणाले की, पूर्वीपासून पत्रकारीता खडतर मार्गाची राहिली आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. शासनात काम करताना चांगले काम पत्रकारांमुळे समोर येते. सरकारी योजना लोकार्पयत पोहचविण्यास व समाजमनात जागृती होण्यासाठी पत्रकारांची कायमच मदत होते.
डॉ. सुरेश पठारे म्हणाले की, समाजात पत्रकारितेचे मोठे योगदान आहे. लोकशाही टिकविण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका पत्रकारांची राहिली आहे. समाज परिवर्तनामध्ये काम करणारे सर्वात मोठे समाज कार्यकर्ते म्हणजे पत्रकार. समाज विकासासाठी काम करणारेपण पत्रकारच आहे. सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेची भूमिका आहे. सरकारी ध्येय धोरणे ठरतात, ती माणसाच्या समाज विकासाच्या अनुषंगाने असावे ही तळागाळात माहिती सरकारला पोहचिण्याचे काम पत्रकार करतात. मानवी जीवनात बदल घडवणारा हा पत्रकार आहे. पत्रकारिता माणसांच्या जीवनाशी निगडीत व्यवसाय आहे. पत्रकारितेत कौशल्यासोबत मुल्य गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत जर कोणी परिवर्तन घडवून आणणार असेल तर तो पत्रकार असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी सुरु असलेल्या कार्याची व संघटनेची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांनी केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शहरातील पत्रकार, इलेक्ट्रॉनिक व डिजीटल माध्यमाचे प्रतिनिधी, वृत्तपत्र छायाचित्रकार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बेंडाळे, सुभाष चिंधे, मिलिंद देखणे, शिल्पा रसाळ, भूषण देशमुख, विजयसिंह होलम, शिरीष कुलकर्णी, दिलीप वाघमारे, मयूर मेहेता, आबिद दुल्हेखान, प्रदीप पेंढारे, बाबा ढाकणे, वाडेकर अण्णा, अन्सार सय्यद, जी.एन. शेख आदींसह अहमदनगर जिल्हा, डिजिटल मीडिया परिषद अहमदनगर, शहर पत्रकार समन्वय समिती, केडगाव प्रेस क्लब, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशन, प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, अहमदनगर जिल्हा जाहिरातदार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व शहरातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत वरकड यांनी केले. आभार डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी मानले.
सामाजिक बांधिलकी जपत मराठी पत्रकार परिषदेने पत्रकार बांधवास दिली सायकलची भेट . पायी फिरुन पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार दीपक अतितकर यांना परिषदेच्या माध्यमातून पत्रकार दिनी सायकलची भेट देण्यात आली. पत्रकार दिनी मिळालेल्या या अनोख्या भेटीने ते देखील भारावले.