👉हा पक्ष निष्ठावाण कार्यकर्त्यांवर अन्याय आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – शहरात ज्या ज्या वेळी पक्ष संघटना विस्कळीत होत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणूनच पक्षाची शहरातील संघटना गेल्या २० वर्षापासून जी होती ती आजही आहे. माझ्याकडे पद होते त्यावेळीही आणि आलीकडे ते काढून घेण्यात आले. तरी शहरातील संघटना विस्कळीत झाली नाही आणि कोणी माझ्यापासून दूर गेले नाही. मी कार्यकर्ता आणि ब्लॉक शहराध्यक्ष म्हणून कार्य करण्यास, नेतृत्व करण्यास सक्षम होतो व आहे. पण, माझ्याकडे सत्ता, पैसे, गुंडागिरी अशी कोणतीही बाजू नव्हती आणि नाही .तरीही आज निलंबनाची कारवाई झाली. पण संघटन आहे तेथेच आहे. ही माझ्या कामाची पावती होय.असे शहर काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी निलंबन कारवाईवर पत्रकार षरिषदेत बोलतांना स्पष्ट केले.फिरोज खान, राजेश बाठीया, आर आर पाटील, एम आय शेख आदिंसह काॅग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत त्यांनी पत्रकारांना प्रसिध्दीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे- सन २०१० या वर्षी राज्यातील पक्षाच्या ५५४ ब्लॉक कमिटी पैकी नगर ब्लॉक कमिटी अध्यक्ष म्हणून माझा मुंबईत सत्कार करण्यात आला. राज्यातील उत्कृष्ठ पक्षकार्य करणा-यांचा तो सन्मान होता. माझ्यासहीत १० अध्यक्षांना हा पुरस्कार मिळाला होता.
शहरातील पक्षाचे कार्यकर्तेही सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. खर तर हा त्यांचा सन्मान आहे. कारण त्यांची व तत्कालीन शहर जिल्हा अध्यक्षांची मला साथ होती. जर मी स्वार्थ व संधी साधून पक्षहिताला बाधा आणली असती तर हे संघटन केव्हाच विस्कळीत झाले असते. पण, तसे झाले नाही. म्हणून माझ्यावरील कारवाई ही व्यक्तीगत माझ्यावर जरी असली तरी ही कारवाई शहरातील पक्षनिष्ठ अशा सर्वांवरच त्यामुळे ठरत आहे.
किरण काळे यांची नियुक्ती झाली त्यावेळी आपण या नियुक्तीचे स्वागत केले. एकत्र काम करण्याचा आम्ही निर्णयही घेतला, पण आम्ही कालिका प्राईड, लालटाकी कार्यालयात येऊ नये, एकत्र काम करू नये असच सूचवल गेले. स्वतंत्र पक्षकार्य करतानाही आमच्यावरच गटबाजीचा आरोप झाला. ज्या ज्या वेळी आम्ही वस्तुस्थितीला धरून खुलासा केला तर ती तक्रार आहे. असेच भासूवन गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला गेला. आजही तेच होत आहे. अहमदनगर म.न.पा.त स्वीकृत नगरसेवक पदासाठी मी इच्छुक होतो शहर पक्षातील सर्वांचा मला पाठींबा होता. पण मला डावलण्यात आले. त्यावेळी श्रेष्ठींनी ज्यांचे नाव सुचविले होते आणि ज्यांना ते पद मिळाले ते दोघे आज पक्षाबाहेर आहेत. एक भा.ज.पा. त तर दुसरे शिवसेनेत आहे. मला डावलूनही मी पक्षातच राहीलो. नगरमध्ये मी पक्ष जिवंत ठेवल्याचे स्वतः ना. बाळासाहेब थोरात यांनी मंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावर असताना किरण काळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले होते. त्याचे हे फलित आहे का ? मला तर प्रदेशवर घेण्याचे ना.थोरातांनी किरण काळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणात सांगितले होते. प्रदेशचे पद तर मिळाले नाही.पण, शहर अध्यक्षपदही काढून घेण्यात आले.निलंबन कारवाई पर्यंत …
श्री. काळे यांची नियुक्ती होण्यापुर्वी मला शहर जिल्हाध्यक्ष पदावर नेमण्याची मागणी होती. तीच मागणी तिळगुळ समारंभात केली. मागणी करणं गैर काय? त्या कार्यक्रमात श्री. काळे यांना पदावरून काढून टाकावे किंवा त्यांच्यावर टिका झाली नाही. तरीही आमच्यावर खोटा आरोप.. *पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ* असे नवे समीकरण आम्ही स्विकारले नाही. म्हणून पक्षात आमचा छळच झाला आणि आज पक्षातून निलंबित केले.
आपण सुज्ञ पत्रकार आहात. पक्षाला बाधा येईल किंवा व्यक्तीगत संकुचित वृत्तीने मी काम केले का ? तसे असेल तर ही कारवाई योग्यच आहे अस म्हणाव लागेल. राष्ट्रवादी पक्ष आणि आ. जगताप यांच्या सुचनेनुसार मी पक्ष कार्य करतो असा माझ्यावर आरोप होतो. पण, मला तसे करायचे असते तर मी राष्ट्रवादीत गेलो असतो आणि मागच्याच मागण्या निवडणूकीत संग्राम जगतापच्या विरोधात सत्यजित तांबे यांचा प्रचार केलाच नसता. पक्षाचे आदेश आपण प्रत्येक निवडणुकीत पाळले. आघाडी होती तेव्हा आघाडी आणि पक्षाचा उमेदवार आहे. तेव्हा पक्ष उमेदवार अशी भूमिका बजावली. स्व. सुवालाल गुंदेचा, स्वं. रईसा आपा शेख, श्री. ब्रिजलाल सारडा, डी.एम. कांबळे, प्रा. बेडेकर सर, श्री. सुभाष गुंदेचा, श्री. विजयसिंह परदेशी आदि नेत्यांसह १९७७-७८ सालापासून आजपर्यंत पक्षात कार्यरत अशा सर्वांच पाठबळ माझ्यामागे होत आणि आहे .ते मी पक्षात निष्ठेने कार्य केले म्हणुन.. मी ज्या ज्या वेळी पक्ष कार्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना (ना. थोरात साहेबांसह) दिला व ज्या ज्या वेळी माझ्यावर खोटे आरोप झाले त्याचा खुलासा दिला ते सर्व आपणासमोर ठेवत आहे. आपण सर्व सुज्ञ पत्रकार आहेत. आपण ते सर्व पाहावे. व जे आपणाला पटेल, सत्य जे काय आपण जाणून घ्यावे हीच विनंती आहे.
माझ्यावर झालेला अन्याय हा पक्ष कार्यकर्त्यांवर असून या अन्यायाचा विरोधात पक्ष कार्यालय (मुंबई) समोर सामुदायिक उपोषण करण्याची मानसिकता माझी असून कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेऊ.
निलंबन का करू नये ? या नोटीसीला मी लेखी उत्तर दिले त्यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आरोप करणारे आणि आम्ही समोरासमोर बसून सत्य जाणून घेऊ. पण तसे होण्यापुर्वीच निलंबनाची कारवाई झाली. ही कारवाई त्यांना का करावी लागली याचे उत्तर आपण पत्रकारांनी शोधावे अशी माझी विनंती आहे.
१६ वर्षापूर्वी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पक्षात शहराध्यक्ष पद दिले. ते ज्यांनी मिळवून दिले त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पदावरून आणि पक्षातून काढण्यासाठी ज्या नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले ते पदाने, पैशाने किती मोठे असले तरी त्यांचे हे कार्य किती संकुचित वृत्तीचे असल्याचे मानावे काय, असे श्री भुजबळ यांनी म्हटले.