संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार येथील इंदीरानगर झोपडपट्टीमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत गणेश दिलीप वाघस्कर (वय ४७ रा.धनगरगल्ली, भिंगार ता. जि. अहमदनगर) या नावांच्या व्यक्तींना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकाॅ अजय नगरे, पोहेकाॅ जालिंदर आव्हाड, पोहेकाॅ व्ही आर गारूडकर, पोना भानुदास खेडकर, पोकाॅ अमोल आव्हाड, पोना राहुल द्वारके आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
![](http://sangramsattacha.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230423-WA0186-2-1024x506.jpg)
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर पाथर्डी रोडवरील इंदीरानगर झोपडपट्टीमधील पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण स्क्रीनवर बिंगो नावाचा हारजीतीचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळतो व खेळवितो, आता गेल्यास मिळून येईल अशी भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली. यावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांनी आपल्या सर्व ‘टिम’ला भिंगार इंदीरानगर झोपडपट्टीतील अवैध धंद्यांवर छापेमारीच्या सूचना दिल्या.
भिंगार कॅम्प पोलिस टिम’ने नगर-पाथर्डी रोडवरील इंदीरानगर झोपडपट्टीमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. यात तेथे एकजण खुर्चीवर बसून त्याचेसमोर चालू असलेला स्क्रीनवर बिंगो नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आला. त्याच्या आजुबाजूस उभे असणा-यांना पोलिसांची चाहुल लागताच पळून गेलेने खुर्चीवर बसलेल्यास जागीच पकडले. पोलिसांनी त्यास त्याचे नाव गणेश दिलीप वाघस्कर ( रा. धनगरगल्ली, भिंगार ता. जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. या छाप्यात जुगाराची साहित्यं व रोख रुपये मिळून आली. ९ हजार रुपये किंमतीचा एक काळे रंगाचा PHX कंपनीचा ३२ इंची एलईडी स्क्रीन, २ हजार १३५ रु. रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा ११ हजार १३५ रु. रोख रक्कमं, जुगाराची साधनासह गणेश दिलीप वाघस्कर याला ताब्यात घेतले. याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.