नेवासा, भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करणारा सराईत पकडला

नेवासा, भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करणारा सराईत पकडला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर : नेवासा व भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी नगर एलसीबी टिम’ने पकडला. पोपट लक्ष्मण नरोडे (रा.मोमीन आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या पतीसह दुचाकीवरुन हंडी निमगाव, (ता.नेवासा) येथे जात असताना अनोळखीने गाडी त्यांची गाडी थांबवून तुम्ही माझे आईच्या अंगावर का थुंकला ? असे म्हणून फिर्यादीचे गळयातील ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीने चोरुन घेऊन गेला, याबाबत सौ.जिजाबाई कारभारी बुळे (रा.मजले चिंचोली, ता.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पो.स्टे.गु.र.नं. ८०८/२०२४ बीएनएस कलम ३०९(४), ३५१(२) प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधा करीता पथक नेमून जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबीचे पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, सागर ससाणे व मेघराज कोल्हे यांची टिम नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सूचना देऊन टिमला रवाना केले. तपास पथकाने चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी पोपट लक्ष्मण नरोडे, (रा.मोमीन आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) याने केला आहे. सध्या तो मोगरा हॉटेलजवळ (तपोवन रोड, अहमदनगर) येथे आला आहे. अशी माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती एलसीबी टिम’ला देऊन आरोपीची खात्री करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. पथकाने लागलीच तपोवन रोड, अहमदनगर येथे जाऊन, सापळा लावून संशयीतास ताब्यात घेऊन, पोलीस पथकाची ओळख सांगून ताब्यात घेतले. ताब्यातील इसमांकडे कौशल्याने विचारपुस करता त्याने नेवासा, भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोन्याचे दागिणे शनी चौक (राहुरी) येथील सोनारास विक्री केल्याची माहिती दिली. त्यावरुन अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे ४ गुन्हे उघडकिस आले आहेत. आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता एकुण ४ दाखल गुन्हे उघडकिस आले आहेत.

 

 

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!