नूतन शिर्डी उपविभागीय पोलिस कार्यालय व शिर्डी,कोपरगाव पोलीस ठाण्याचे बुधवारी उद्घाटन


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :-
शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला व पोलीस ठाणे, शिर्डी येथील ११२ निवासस्थान व कोपरगाव शहर पोलीस ठाणे नूतन इमारतीचे उद्घाटन दि.६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. होणार आहे. या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे हे असून, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगर विकासमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे, खा.सदाशिव लोखंडे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.किशोर दराडे, आ.राधाकृष्ण विखे आणि मुंबई पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य रजनीश सेठ, मुंबई पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या.चे विवेक फणसळकर, नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जे.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर आदिंची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!