- https://x.com/mataonline/status/1869367401386786850?t=xMbecLsTe1WfCZHyJjyWbA&s=08
दुर्घटनेत 1 नौदल कर्मचारी आणि नौदलाच्या क्राफ्टमधील 2 जएच् सह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटकडे जाणार्या नीलकमल बोट दुर्घटनेतील मयतांची संख्या 13 पेक्षा जास्त आहे. नेव्ही बोटीची प्रवाशी बोटीस जोराने धडक बसलल्याने या झालेल्या भीषण दुर्घटना झाली. या दरम्यान यावेळी बोटीत 80 प्रवाशी होते. अपघातातील दोघांवर नौदल रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. नीलकमल ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जात होती. यादरम्यान नेव्हीच्या स्पीड बोटने या बोटीला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
https://x.com/mataonline/status/1869367401386786850?t=xMbecLsTe1WfCZHyJjyWbA&s=08
आता या अपघाताचं खरं कारणं समोर आली आहे. याबाबत स्वत: नौदलाने माहिती दिली आहे. इंजिन चाचणी करत असलेल्या नौदलाच्या यानाचे नियंत्रण सुटले आणि कारंजा, मुंबई येथे नीलकमल या प्रवाशी फेरीला धडकली, अशी माहिती नौदलाने दिली आहे.
अपघात होताच तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. चार नौदल हेलिकॉप्टर, 11 नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका बचावकार्य करत आहेत. या भागातील नौदल आणि सिव्हिल क्राफ्टने उचललेल्या वाचलेल्यांना आसपासच्या जेटी आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. आतापर्यंत 99 जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशीही माहिती नौदलाने दिली आहे.