संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : छ. शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर अपमानकारक मजकूर असणारा व्हिडीओ प्रसारित झाला होता. या निषेधार्थ सोमवारी (दि.१३) शेवगाव शहरासह बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. या दरम्यान ‘त्या’ संबंधित तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
छ. शिवाजी महाराज यांच्या विषयी सोशल मीडियावर अपमानकारक व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या ‘त्या’ तरुणांना अटक करावी, म्हणून शिवप्रेमी युवकांनी मोर्चा काढत शेवगाव पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केली होती. काल रात्री पुन्हा रास्तारोको करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी त्या संबंधित तरुणांना अटक केली आहे. एकंदरीत काल दिवसभर शेवगावसह तालुक्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले होते. वेगवेगळ्या पक्ष-संघटनाकडून या घटनेचा निषेध नोंदवला जात होता. या पार्श्वभूमीवर शेवगाव पोलीसांनी रात्री त्या संबंधित दोघा तरुणांना शेवगावमधील नाईकवाडी मोहल्ला येथून ताब्यात घेतले.
या घटनेच्या निषेधार्थ शेवगाव शहर तसेच तालुक्यातील मुख्य बाजार पेठेचे गाव म्हणून ओळखले जाणारे बोधेगाव सोमवारी (१३) कडकडीत बंद पाळण्यात आला.