निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा : भातोडीतून केला शुभारंभ, गावागावात जाणार

निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा : भातोडीतून केला शुभारंभ, गावागावात जाणार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या वतीने नगर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा बुधवार (दि.२४) पासून सुरू करण्यात आला आहे. नगर तालुक्यात भातोडी येथुन प्रचार दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला, त्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उध्दवराव दुसुंगे, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या सह स्थानिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि. १ मे पर्यंत दररोज तालुक्यातील गावागावात हा दौरा काढला जाणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!