निमगाव वाघा उपसरपंच दीपक काळे यांना मातृशोक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निमगाव वाघाचे माजी उपसरपंच व उद्योजक दीपक लखू काळे यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई लखु काळे यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा दीपक, सून हेमलता, नात ईशा, नातू असा परिवार आहे. कै.रत्नाबाई काळे यांच्या अचानक जाण्याने निमगाव वाघा ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा दशक्रियाविधी दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता निमगाव वाघा येथे होणार आहे.