संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- माजीमंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त राहाता तालुक्यातील निमगाव येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या सर्व गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत निमगाव को.सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वह्या व स्कूल बॅगचे वाटप सोमवार (दि.२७) सकाळी १० वाजता विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव बाराहाते पाटील होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक सोपानराव जगताप (अण्णा), ज्येष्ठ कार्यकर्ते खंडेराव कडलग, विद्यमान सरपंच कैलासभाऊ कातोरे, उपसरपंच अजयभाऊ जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरदभाऊ मते, साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाचे व्हाईस चेअरमन मनोजभाऊ वदक, श्रद्धा सबुरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजूभाऊ गाडेकर, निमगाव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन रघुभाऊ कातोरे, भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊ जगताप, साई माऊली सहकारी पतसंस्थाचे व्हाईस चेअरमन कैलासभाऊ गाडेकर, महामानव फाऊंडेशनचे संस्थापक सिमोनभाऊ जगताप, काकासाहेब मते, संजय मते, माजी सरपंच रावसाहेब जगताप, संजय वदक, सदस्य राहुलभाऊ कातोरे, विनायक जगताप, सदस्य विजूभाऊ गाडेकर, सतिषभाऊ डेंगळे सरकार, विजूशेठ चोपडा, सिकंदर शेख व मुख्याध्यापक श्री शिंदे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.