निपाणी वाडगाव ग्रामपंचायतीत १९ लाखांचा भ्रष्टाचार

👉तत्कालीन महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
श्रीरामपूर
– तालुक्यातील निपाणीवडगाव ग्रामपंचायतीमध्ये २०१५-१६ या वर्षात १९ लाख ३६ हजार ५०५ रुपयाचा अपहार केल्याचे लेखा परीक्षणात उघड झाल्याने तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहराचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.


याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रावसाहेब दगडू अभंग यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०१५-१६ या वर्षातील जमा खर्चाचे सहायक लेखा परीक्षण अधिकारी एस बी पवार यांनी लेखा परीक्षण केले असता १३ व्या वित्तआयोगातील ग्रामनिधी, पाणी पुरवठा, अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास निधी यामध्ये हा अपहार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १३ व्या वित्तआयोगाच्या निधी खर्चात ११ लाख १२ हजार ३१० रुपये, ग्रामनिधी खर्चात ७ लाख ३८ हजार १९५ रुपये, पाणी पुरवठा खर्चात ८६ हजार रुपयांचा अपहार झाला आहे.
तत्कालीन सरपंच शिला पवार यांनी १० लाख ४० हजार १८५ रुपये तर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विजय सोनवणे यांनी ८ लाख ९६ हजार ३२० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.विस्तार अधिकारी अभंग यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन सरपंच शीला दिनकर पवार राहणार निपाणीवडगाव तालुका श्रीरामपूर व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विजय भानुदास सोनवणे राहणार कान्हूरपठार तालुका पारनेर, यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ठकबाजी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे हे पुढील तपास करीत आहे. ग्रामपंचायतीमध्ये दर महिन्याला मासिक सभा होत असते. त्यामध्ये झालेल्या जमा खर्चाला मंजुरी देणे हा विषय असतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!