संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई: राज्यातील कृषी व संलग्न पदवीधर व पदविकाधारक यांना पक्षाच्या मुख्य विचारधारेशी जोडणे व त्या द्वारे शेतकऱ्यांशी संपर्क करण्याची नवीन यंत्रणा उभा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी तर्फे प्रदेश पातळीवर ” भाजपा ॲग्रीकॉस किसान मोर्चा ” नावाचे नवीन आयाम सुरु करण्यात आला असून जिल्ह्यातून नितीन नवनाथ उदमले यांच्यावर “प्रदेश सहसंयोजक” म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
दि.16 मार्च ला प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवजी काळे, विधानपरिषद नेते आ. प्रवीणजी दरेकर, श्रीकांतजी भारतीय, प्रदेश संघटन सचिव विक्रांत पाटील यांच्या उपास्थितीत याची घोषणा करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्ह्यातील नितीन उदमले हे कृषि पदवीधर असून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्य केलेले आहे. या आयामाच्या माध्यमातून कृषी, कृषी अभियांत्रिकी, पशुवैद्यक, वन, मत्स्य इ विषयातील पदवीधर आणि पदविका धारकांना संघटित केले जाणार आहे. त्याद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, शेतीसाठीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवने, पक्षाचे कृषी विषयक निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचवने, सरकारच्या कृषी विषयक योजनांची परिणामकरक अंमलबजावणी करणे, पक्षाच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला उत्तर देणे, असे उद्देश ठेवण्यात आले आहेत. या माध्यमातून राज्यभरातील कृषी पदवी आणि पदविका धारकांचे जिल्हा व तालुका स्तरावर संगठन करण्यात येणार आहे.