संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नगर तालुक्यातील पिंपळगांव माळवी येथे भिल्ल समाजातील लोकांना आदिवासी विकासमंत्री प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष व आदिवासी समाज्याचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण यांच्या हस्ते नवीन 76 रेशनकार्ड वाटप करण्यात आले.
नगर तालुक्यातील पिंपळगांव माळवी येथे भिल्ल समाजातील लोकांना नवीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी तहसील कार्यालय नगर येथे आदिवासी समाज्याचे अध्यक्ष राम चव्हाण यांच्या अर्जाची दखल घेऊन या अनुशंगाने आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना नवीन रेशनकार्ड वाटप केले.
यावेळी सागर गुंड, झिने सर, अशोक शिंदे, बाबासाहेब झिने व अदिवासी विकास परिषदेचे व राष्ट्रवादीचे सामाजी न्याय विभागाचे सावता चव्हाण, कुणाल काळे, महेश चव्हाण, बाळु काळे आदिंसह आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.