संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- अहमदनगर पोलिस दलातील पोहेकॉ अशोक आबनावे,पोहेकॉ अनवर अली सय्यद व पोहेकॉ अर्चना काळे या तिघांनी नाशिक येथे झालेल्या वेस्ट झोन अथलेटिक्स विविध स्पर्धेमध्ये
गोल्ड मेडल पटकाविले आहे. या यशाबद्दल तिन्ही पोलिस कर्मचा-यांचे अहमदनगर पोलिस पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
नाशिक येथे झालेल्या वेस्ट झोन अथलेटिक्स स्पर्धेमध्ये पोहेकॉ अनवर अली सय्यद यांनी वय गट 50 मध्ये 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे 4×100 रिले व लॉंग जंप या सर्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून 4 गोल्ड मेडल मिळवले. तसेच पोहेकॉ अर्चना काळे यांनी वयोगट 40 मध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे,400 मीटर धावणे, 4×100 रिले व 4×100 मिक्स रिले या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून पाच गोल्ड मेडल पटकविले व पोहेकॉ अशोक आबनावे यांनी वयोगट 55 मध्ये लॉंग जॅममध्ये सिल्वर मेडल, 400 मीटर धावणे ब्रांझ मेडल व 4×100मीटर मिक्स रिले धावणे ब्रांझ मेडल मिळून असे तीन मेडल मिळवून या सर्वांनी पोलीस दलाचे नाव उंचावेल अशी कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोहेकॉ अशोक आबनावे,पोहेकॉ अनवर अली सय्यद व पोहेकॉ अर्चना काळे या अहमदनगर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.