‘नाशिक आयजी’पदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती
श्रीरामपूरच्या स्वाती भोर यांची रेल्वे पोलिस विभागात तर शिर्डी डिवायएसपीपदी शिरीष वमने
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुधवारी ((दि.३१) रात्री उशिराने बदल्या झाल्या झाल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक या रिक्त जागेवर नव्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे. तर शिर्डी डिवायएसपीपदी शिरीष वमने, श्रीरामपूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची छत्रपती संभाजीनगर लोहमार्गकडे बदली झाली आहे.
येणा-या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे धोरण राबवले जात असून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने, बुधवारी रात्री काढले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांसह श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या जागी ठाण्याचे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली झाली आहे. कराळे यापूर्वी नगरला उपअधीक्षक होते. श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची छत्रपती संभाजीनगर लोहमार्गकडे पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लातूरचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती झाली आहे. शिर्डी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या जागी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांची बदली झाली आहे. मिटके यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. मिटके यांनी यापूर्वी नगर शहर व श्रीरामपूरचे उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा त्यांचा सुसाट होता. यामुळे नाशिककर जनता त्रस्त झालेली असताना धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाजी उमाप यांची नाशिक ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आणि अवैध धंदे करणाऱ्यांचं धाब चांगलंच दणाणलं होतं. आपल्या कार्यकाळात शहाजी उमाप यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना सळो की करून सोडल्याने त्यांची लवकरच बदली होईल अशा चर्चांना उधान आलं होतं.
दरम्यान या चर्चा आता खऱ्या ठरल्या असून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची बदली होऊन आता नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी विक्रम देशमाने यांनी नाशिकच्या सह आयुक्त पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.त्याचबरोबर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी असलेल्या बीजी शेखर-पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायला थोडाच अवधी बाकी असताना त्यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी दत्ता कराळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नाशिकला नवीन अधिकारी भेटले असून जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी अवैध धंद्यांना आळा घालण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.