संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ४ मंत्रिपदे देण्यात आली आहे. भाजप नेते नारायण राणे यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्यो मंत्रालयाचे खातं दिलं आहे. राणेना मंत्रिपद दिल्यामुळे भाजप-शिवसेनेची युतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांना त्यांची क्षमता पाहून मंत्रिपद दिलं असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात अशी प्रतिक्रिया भाजप- शिवसेनेच्या युतीवर दिली आहे. महाराष्ट्राच्या वाटेला ४ मंत्रिपद मिळाली असल्यामुळे फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी नाशिकमध्ये सुरु करण्यात आलेल्या सिटी बससेवेबाबत आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी म्हटलं की, अतिशय आनंद आहे की, अतिशय अत्याधुनिक प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टम नाशिकला देत आहोत. ही अजून डेव्हलप करायला लागणार आहे. महानगपालिकेने ५० बसेस केंद्र सरकारकडे मागितल्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु निओ मेट्रो आणि बस सिस्टम या दोन्ही सुरु झाल्यानंतर एका आधूनिक शहरात नाशिकचे रुपांतर होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.