संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – श्री संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या सप्ताहाच्या ८९ व्या वर्षाचे यजमानपदाचे शिवधनुष्य पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
श्री संत भगवान बाबांनी फिरता नारळी सप्ताहाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम ८९ वर्षापूर्वी श्री क्षेत्र नारायण गडाच्या पायथ्याशी असलेले पखालडोह या ठिकाणी सुरू केला होता त्यांचे पश्चात त्याच सप्ताहाची परंपरा भगवान गडाचे द्वितीय उत्तर अधिकारी वै. गुरुवर्य श्री संत भिमसिंह महाराज यांनी सुरू ठेवून बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. श्री संत भीमसिंह महाराज यांच्या वैकुंठ गमनानंतर श्री क्षेत्र भगवान गडाचे. तृतीय मताधिपती महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाला एक वेगळी अशी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे दि.४ एप्रिल रोजी हा महामहोत्सव भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडीमध्ये सुरू होत असून .या सप्ताहामध्ये भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांच्या रसाळ वाणीतून सात दिवस श्रीमद् भागवत कथेचा भाविकांना आनंद घेता येणार आहे .
या सप्ताहात महंत श्रीकृष्ण महाराज शास्त्री, तुकाराम महाराज मुंडे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, निवृत्ती महाराज देशमुख, अमृत महाराज जोशी, केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तने सेवा यामध्ये होणार आहेत तर 11 एप्रिल रोजी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.