संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी -राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर व प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टन्स नियम पाळून नाबार्डच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्ताने व 40 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून राहुरी येथे नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
यावेळी प्रशिक्षणाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
दरम्यान प्रास्ताविक भाषणात जिल्हा समनव्य अधिकारी संजय गर्जे यांनी नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या व नाबार्डने जिल्ह्यात महिलि विकास मंडळाच्या कामाबाबत थोडक्यात माहिती देऊन बचत गटातील महिलांनी नाबार्डच्या योजनांचा फायदा घेऊन आपले विविध उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहनही केले. तसेच यावेळी त्यांनी विविध उद्योग व्यवसायांची माहिती दिली. महिलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
व्यासपीठावरील आरएसईटीआय चे संचालक तुकाराम गायकवाड यांनी त्यांच्याद्वारे होणारे विविध प्रशिक्षणाची व योजनांची माहिती दिली.
नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक शिलकुमार जगताप यांनी नाबार्ड दिनानिमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा देऊन नाबार्डच्या विविध योजनांची मांडणी करून त्या फायदा कसा घेता येईल. याबाबत बचत गटातील महिलाना मार्गदर्शन केले व महिलांच्या नेतृत्व गुण कसे असावे. त्याचे विविध टप्पे मांडणी केली. यावेळी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी सुनील पैठणे, बार्टीचे श्री पिरजादे यांनी मार्गदशन केले.
यावेळी बार्टीचे एजाज पीरजादे, एडीसीसी बँक व व्यवस्थापक महाडिक, आव्हाड मॅडम, सीएमआरसी अध्यक्ष पुष्पाताई धनवटे, सीएमआरसी व एनयुआयएम स्टाफ व एआयएफ, राहुरी व देवळाली प्रवरा अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक महेश अबुज यांनी केले. आभार क्षेत्रीय व्यवस्थापक भारती देशमुख यांनी केले. यावेळी वस्तीस्तर संघाचे पदाधिकारी व बचतगटाच्या महिल उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सहयोगिनी व सीआरएफ यांनी परिश्रम घेतले.