नाफेड, एनसीसीएफ कांदा खेरेदीत पारनेर, श्रीगोंदा तालुक्याला प्राधान्य द्या : प्रसाद खामकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पारनेर – ग्राहक व्यवहार विभाग , भारत सरकारने या वर्षी ५ लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची महिती ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आय. एस. नेगी आणि संचालक सुभाषचंद्र मीना यानी दिल्याने शेतकरी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ग्राहक व्यवहार विभागाने नाफेड आणि एनसीसीएफ या सरकारी संस्थाना खरेदीसाठी नियुक्त केले आहे. शनिवारी नाशिक येथे या संदर्भमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आय.एस नेगी आणि संचालक सुभाषचंद्र मीना नाशिक वरुन अहिल्यादेवीनगर मार्गे पुणेकडे जात असताना पारनेर तालुक्यातील शेतकरी नेते प्रसाद खामकर आणि श्रीगोंदा येथील रियल ऑर्गो फार्मर्स कंपनीचे संचालक संभाजीराव घुटे पा. यानी अहिल्यादेवीनगर मध्ये या केंद्रिय अधिकारी यांची भेट घेतली. आणि नाशिक नंतर अहिल्यादेवीनगर जिल्हामधील पारनेर ,नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातही चांगल्या प्रतिच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. म्हणून नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीमध्ये पारनेर, नगर आणि श्रीगोंदा तालुक्याला प्राधान्य देन्यात यावे आणि पारनेर आणि श्रीगोंदा मध्ये नाफेड एनसीसीएफचे कांदा खरेदी केंद्र सूरू करावे आणि तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी याना न्याय द्यावा याबाबत निवेदन ग्राहक व्यवहार विभागाचे अधिकारी याना दिले. ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आय एस नेगी यानी प्रसाद खामकर यानी केलेल्या मागणीला अनुकुल प्रतिसाद देत पारनेर आणि श्रीगोंदा येथे पुढील महिन्यात नाफेड आणि एनसीसीएफचे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.