संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अमरावती : नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे घेण्यात येणारी नेट ही परीक्षा ९९.१५ टक्के गुण मिळवून प्रथम प्रयत्नात खुल्या प्रवर्गातून मराठी विषयामध्ये उत्तीर्ण केली. त्याबद्दल कार्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ही बाब इतर सहकाऱ्यांना प्रोत्साहनपर असल्याची प्रतिक्रिया अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

या यशाबद्दल त्यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी विशेष अभिनंदन केले.