नागरदेवळात तलवार बाळगणारा पकडला , भिंगार पोलिसांची कारवाई

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः भिंगारनजिकच्या नागरदेवळे या गावात धारदार तलवार बाळगणा-यास भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले. त्यासंबंधितांकडून तलवार जप्त करून आर्म अ‍ॅक्टनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल चाँद शेख (वय26, रा नागरदेवळे ता.जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार सफौ के.बी.सोनार, सफौ रेवननाथ दहिफळे, पोहेकॉ दिपक शिंदे, पोहेकॉ गणेश साठे, पोकॉ अमोल आव्हाड, पोकॉ संदीप थोरात आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.12 फेब्रुवारी 2024 ला भिंगार पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांना माहीती मिळाली की, नागरदेवळे येथे एकजण दहशत करुन हातात धारदार तलवार अवैध्यरित्या घेऊन फिरत आहे. आता गेल्यास मिळून येईल. या माहितीवरून सपोनि श्री राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे तपास पथकातील अंमलदार व बीट मार्शलचे अंमलदार यांना माहिती ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. भिंगार कॅम्प पोलीसांची टिम त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास व त्याच्या हातातील धारदार तलवार शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोहेल चाँद शेख (रा नागरदेवळे ता.जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुरंन 124/2024 आर्म अ‍ॅक्ट 4/25 मपोकाक 110/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!