नवरात्रौत्सवात मोहटादेवी चरणी २ कोटीचे दान

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी –
राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर यावर्षी संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र महोस्तवामध्ये लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन सुमारे २ कोटी रुपयांचे दान देवीस अर्पण केले.


देवस्थानचे दानपेटयाची मोजदाद नुकतीच अहमदनगर येथील धर्मादाय आयुक्त यांचे प्रतिनिधी डॉ.डी. एस. आंधळे,देवस्थान विश्वस्त ,पाथर्डी येथील सराफ मे.काशिन्नाथ वामन शेवाळे, पोलीस व देवस्थान सुरक्षा व सीसीटीव्ही च्या निगराणीमध्ये संपन्न झाले. यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी २७ लाख ६० हजार ५५४ मात्र तसेच सोने ४० तोळे मूल्यांकन रूपये १६ लाख ६४ हजार , चांदी वस्तू १३ किलो ८१० ग्रम मूल्यांकन रुपये ५ लाख १३ हजार ९९२ मात्र, चांदीचे छत्र व पंचारती मूल्यांकन रुपये ३ लाख मात्र, तसेच विविध देणगी पावती रुपये ४० लाख २९ हजार ९३० मात्र, ऑनलाइन स्वरुपात देणगी रुपये ४ लाख ८६हजार २०३ मात्र प्राप्त झाले. महोत्सवामध्ये मुळचे शेडगाव ता. संगमनेर येथील देवीभक्त व मुंबई येथील बी.जे ऑटोमेशन चे संचालक उद्योजक बाबूराब सांगळे यांनी देवस्थानास सुमारे ३ लाख रुपये किमतीची अद्यावत सीसीटीवी सिस्टम देणगी स्वरुपात अर्पण केली. अशा विविध स्वरुपात रुपये २ कोटींच्यावर उच्चांकी अशी देणगी देवस्थानास प्राप्त झाली.
शारदीय नवरात्र महोस्तव यशस्वी होणेसाठी अहमदनगर चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगर चे जिल्हा न्यायाधीश-१ सुनील गोसावी , पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गट विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे विश्वस्त भीमराव पालवे, अशोक विक्रम दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, आजिनाथ आव्हाड, श्रीमती सरिता दहिफळे , अँड विजयकुमार वेलदे, अँड. सुभाषराव काकडे, सतीश वैद्य, सुधीर लांडगे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या।
देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश-१ सुनील गोसावी यांनी शारदीय नवरात्र महोस्तव शांततेत संपन्न होणे करिता विविध विभागांनी, संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी, भाविक भक्त , ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले. अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.
✍🏻प्रतिनिधी-सोमराज बडे
मोबा.9372295757

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!