संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट, बोल्हेगाव यांची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच ट्रस्टच्या बोल्हेगाव येथील सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या निवडणुकीत श्री देवेंद्रनाथ सेवा पॅनेलचे सर्व 15 उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले. या पॅनेलचे चिन्ह ‘त्रिशुल’ हे होते.
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : दत्तात्रय आढाव, मदन आढाव, उमेश आढव, अॅेड.अशोक बर्हाटे, दिलीप भालसिंग, संजय छल्लारे, श्रीकांत देसाई, आदित्य देशमुख, श्रीमती भाग्यश्री जगदीश फोंडकर, संदिप कोरडे, सौ.उषाताई मोरे, नवनाथ पाठक, प्रकाश सप्रे, फक्कडराव तनपुरे, गणेश विद्ये हे बहुमताने निवडून आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अॅलड.शिवाजी शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना सखाराम टकले, संजय सावंत यांनी सहाय्य केले.
महत्वाचे म्हणजे या देवस्थान ट्रस्टचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र राज्य आहे, या अगोदर पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातील सदस्यांचे वर्चस्व होते. ते मोडून काढण्यात देवेंद्रनाथ पॅनेलला यश आले. या ट्रस्टची स्थापना 1974 साली संस्थापक सुळे महाराज व स्व.विद्ये महाराज यांनी नाथ पंथियांच्या कार्याचा प्रचार व प्रसारसाठी व समाजसेवेसाठी स्थापना केली होती. मात्र मागील अनेक वर्षे बाहेरील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे भक्त व सदस्य गणांची चुकीच्या कार्यपद्धतीवर नाराजी होती.
यंदाच्या वर्षी प्रथम दोन्ही संस्थापक परिवाराचे सदस्यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे. या संस्थेचे 692 सदस्य असून, बोल्हेगांव येथे चार एकर जागेमध्ये या ट्रस्टचे मंदिर, मठ तसेच शाळा चालविली जाते. नूतन पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल भक्तगणांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
याप्रसंगी स्व.देवेंद्रनाथ महाराज यांची सुकन्या भाग्यश्री फोेंडकर यांनी बोलतांना सर्व भक्तगणांचे सदस्यांचे मनापासून आभार मानले. आज आम्हाला निवडून देऊन जो विश्वास दाखविला आहे. त्यास आम्ही निश्चितच पात्र राहून यापुढे ट्रस्टच्या माध्यमातून विकास कामांबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले.
दिलीप भालसिंग व संजय छल्लारे या नूतन सदस्यांनी समयोसूचित भाषण करुन, ट्रस्टच्या उन्नत्ती व उत्कर्षासाठी आम्ही सर्वोतोपरि प्रयत्न करु, त्यासाठी शासनाकडून योग्य ती मदत मिळवण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शेवटी मदन आढाव यांनी आभार मानले. याप्रसंगी निवडणुकीत सहकार्य करणार्या सर्व स्टाफ व सहकार्यांचा यथोचित सन्मान भाग्यश्री फोंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
संकलन : प्रेस फोटोग्राफर अनिल शहा