नगर-सोलापूर रोडवरील हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ः भिंगार पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः : नगर सोलापूर रस्त्यावरील हॉटेल साईश्रद्धा येथे चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा भिंगार पोलिसांनी रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकून पर्दाफाश केला आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगरशहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.प्रताप दराडे, सपोनि जगदीश मुलगीर, पोउपनि गजेंद्र इंगळे, सफौ अकोलकर, पोहेकॉ पालवे, घोडके, डोळे, शिंदे, टकले, पोना शाहीद शेख, पोकॉ लहारे, मपोकॉ कांबळे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास नगर-सोलापुररोड वाकोडी फाटा येथील साई श्रध्दा हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याच्या संशयावरुन काही स्थानिकांनी देहविक्री व्यवसाय चालविणार्यास मारहाण केल्याबाबतची पोलीस ठाण्यात माहीती मिळाली होती. त्यानुषंगाने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणेचे पोनि प्रताप दराडे यांना कळविल्याने पोनि दराडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जगदीश मुलगीर व पोलीस तपासी टीमने वाकोडी फाटा येथील हॉटेल साई श्रध्दा येथे जाऊन पंचासमक्ष छापा टाकला. छाप्या दरम्यान त्या ठिकाणी मुख्य सुत्रधार शहानवाज वहाब आलम हुसेन (रा.तपोवनरोड अहिल्यानगर मुळ रा.गरगलीया ता.ठाकुरगंज जि.किसनगंज, राज्य बिहार) यास ताब्यात घेतले, त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने महिलांना देहविक्री व्यवसाय करीता आणूण हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर रुममध्ये मुक्कामी ठेऊन त्याच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेऊन त्यातून मिळणार्या पैशातून स्वतःची उपजिवीका करीत होता. हॉटेल साई श्रध्दा मधील दोन पिडीत महिला व एक अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. आरोपीविरुद्ध भिंगार कॅम्प पालीस ठाण्यात भादविक 96 सहा पोक्सो 4,8,12, स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतीबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,6 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.