👉भेटी दरम्यान मागणी ऐकून दिली ५ कोटीला मुंजरी !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, सुभाष लोंढे, सचिन जाधव, अनिल लोंखडे, योगिराज गाडे, अक्षय उनवणे, प्रकाश फुलारी, संग्राम शेळके, काका शेळके आदिंसह आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटी दरम्यान नगर शहरातील उड्डाणपुलामुळे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उंची वाढवणे तसेच पूर्णाकृती पुतळा उभारणे गरजेचे झाले आहे. माळीवाडा वेस येथील क्रांतीसुर्यज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारून माळीवाडा वेशीचे सुशोभीकरण करणे यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
या अहमदनगरच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसेच ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे.