संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अनपेड चलान वसुलीची विशेष मोहीमे नगर शहरात राबवून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी २२ लाख रुपयांची वसूली केली आहे. तसेच सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या वाहनांवर देखील यात विशेष कारवाई करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर जिल्हयामध्ये सन २०१९ पासून वन स्टेट वन ई चलान प्रणाली अंतर्गत ई चलान सुरु करण्यात आले आहे. त्याद्वारे वाहतूक नियमभंग करणारे कसुरदार वाहनचालकाविरुध्द कारवाई करण्यात येत आहे. ई चलान प्रणालीद्वारे कसूरदार वाहनचालक यांचेविरुध्द कारवाई केल्यानंतर वाहनचालक यांना दंडाचा भरणा करण्याकरीता १५ दिवसांची मुदत देण्यात येते. परंतु ब-याशे वाहनचालक दंडाचे रक्कमेचा भरणा करीत नाहीत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात अनपेड दंडाची रक्कम मोठी असल्याचे निदर्शनास आल्याने एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहर वाहतूक शाखेचे पोनि मोरेश्वर पेंदाम यांनी नेमणुकीतील अधिनस्त ग्रेड पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह विशेष मोहीमेअंतर्गत अहमदनगर शहरातील विविध चौकांमध्ये दि. ३ एप्रिल ते दि. ३० एप्रिल २०२३ या कालावधीत अचानक नाकाबंदीचे आयोजन केले. या नाकाबंदी दरम्यान अनपेड दंडाचे रक्कमेची वसुली करणेची मोहीम राबविण्यात आली. मोहीमेअंतर्गत एकूण २२ लाख ४ हजार १५० रु. दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे रॉयल इन्फील्ड कंपनीच्या बुलेट या वाहनाचे मुळ सायलेन्सर बदलून त्याऐवजी मोठा व कर्कश आवाज येणारे सायलेन्सर बसविलेल्या, फॅन्सी नंबर, विना नंबर तसेच इतर वाहतूक नियमभंग करणारे २४१ बुलेटधारकांविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ५५ हजार रु. दंडाची वसुली करण्यात आली. त्यांना ते सायलेन्सर काढून मूळ सायलेन्सर बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे कारवाई केलेल्या वाहनधारकांना बदलण्यात आलेल्या सायलेन्सरच्या मोठ्या व कर्कश आवाजामुळे आजारी व्यक्ती, जेष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यावर होणाऱ्या दुष्परीणामांबाबत तसेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत माहीती देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले.
विशेष मोहीम यापुढेदेखील सातत्याने सुरु राहणार आहे. अहमदनगर एसपी अहमदनगर तसेच अहमदनगर पोलीस दल यांच्या वतीने सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की, मोटारवाहन कायद्याचे पालन करुन आपले वाहन चालवावे. तसेच आपले वाहनावर ई चलानचा दंड प्रलंबित असल्यास दंडाचे रक्कमेचा तात्काळ भरणा अन्यथा आपणाविरुध्द पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन अहमदनगर शहर वाहतूक शाखेचे पोनि परिश्वर पेंदाम यांनी केले आहे.