नगर शहरात जोरदार पाऊस,नागरिकांच्या मदतीला धावले खासदार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
नगर : शुक्रवारी रात्री १२.३० वाजता, नगर शहरातील नारहरी नगर आणि गुलमोहर रोड येथील नागरिकांना मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. नागरिकांनी नगरसेवक योगराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली, आणि त्यांनी लगेचच खासदार निलेश लंके यांना याची माहिती दिली.
सिंधी समाजाच्या चालिहो उत्सवाचा कार्यक्रम संपवून परतत असताना खासदार निलेश लंके यांनी तात्काळ आपल्या वाहनाची दिशा बदलून घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची स्थिती पाहून, त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांना पाचारण केले.
नागरिकांनी वारंवार येणाऱ्या या समस्येचा उल्लेख केला असता, खा. लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.