संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- अहमदनगर शहरात घरफोडी करणारे चोरटे पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. किशोर तेजराव वायाळ (वय ४५, रा. मेरा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय ३४ शिरसवाडी, ता. जालना, जि. जालना हल्ली रा. सातारा परिसर, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोउनि मनोज महाजन, पोकाॅ याकुब सय्यद, पोकाॅ दिपक केतके, पोकाॅ सुमित गवळी, पोना भागवत, स.फौ, मोहन चंद्रकांत मुनफन व पोहवा भिंगारदिवे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, चार महिन्यांपूर्वी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घरातून संतोषीमाता कॉलनी, स्टेशनरोड अहमदनगर येथून चारचाकी गाडीतून सारसनगर या ठिकाणी बंगला पाहण्यास असल्याने घराचे सर्व दरवाजे व्यवस्थित लावून समोरील मुख्य दरवाज्यास व्यवस्थित लॉक लावून घेतलेले होते. त्यानंतर ते सारसनगर या ठिकाणी बंगला पाहण्यास गेलो. परत दुपारी १.४६ वाजता परत परी आले असता, त्यांना दरवाज्याचे कुलूप दिसले नाही. तसेच दरवाजा लोटलेला दिसला. त्यावेळी दरवाजा उघडून आत गेले असता, दरवाज्याचे कुलूप हाॅलमधील कॉटवर दिसले. लोखंडी कपाटातील ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने रक्कम ही दिसून आले नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घराचे दरवाज्याचे कुलुप कशाने तरी तोडून आत प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम २ लाख ८७ हजार ५०० रु रकमेचा मुद्देमाल चोरून नेली आहे. या दाखल फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर ४९९६/२०२९ प्रमाणे दि. २३/७/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाखल गुन्हयाच्या तपास सुरु असताना शिरुर पोलीस ठाणे (शिरुर ता. शिरुर जि.पुणे) यांच्या कडील गुन्हा रनि नंबर ६०६/२०२९ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना त्यांना गुप्तबातमीदारमार्फत बातमी मिळाली. घरफोडीतील आरोपी हे शिरुर बसस्थानक येथे येणार आहेत, या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला. या दरम्यान दोनजम हे मिळून आले. त्यांना शिरुर पोलीस ठाण्यात पोलिस घेऊन गेले. दाखल गुन्हयात अटक करण्यात आली.
हे सदर आरोपी हे पोलीस कोठडीत असतांना आरोपींना विश्वासात घेऊन त्यांना इतर गुन्ह्याबाबत चौकशी केली. आरोपींनी अहमदनगर शहरात घरफोडी केल्याचे सांगितले. शिरुर पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर ४९९/२०२१ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे दाखल गुन्हयात वर्ग करण्यात आले. त्यांच्याकड़े गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली त्यांनी घरफोडी करून चोरी केलेला मुद्देमाल्या सोने चांदीचे दागिणांपैकी त्यांचेकडून ६५.५४० ग्रॅम वजनाचे १ लाख ३० हजार रू किमतीचे सोन्याचे लगड हे काढून दिल्याने ते गुन्हयांचे अनुषंगाने दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी किशोर वायाळ याच्यावर जामनेर ( जळगांव), खदान (अकोला), पारध (जालना),
मुंकुंदवाडी (औरंगाबाद), भुसावळ या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी गोरख खळेकर याच्यावर शिरसवाडी, सिडको(औरंगाबाद),
सिटी ( बीड), जिन्सी (औरंगाबाद) व जालना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.