नगर शहर विधानसभा लढाच् ः राष्ट्रवादी कॉँगे्रस शरद पवार गटाच्या कार्यकत्यार्र्ंची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः महाराष्ट्रामध्ये प्रमुख पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात फूट पडून वेगवेगळी गट तयार झाली अन् यातूनच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि कॉँग्रेस ही सर्व पक्ष एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी तयार होऊन नव्याने राजकीय घडामोडीत मोठा बदल होत गेला. यामुळे प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला शाश्वत खात्री नाही की, आपण कोणत्या पक्षाचे काम करावेत. ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. या द्विधीमनस्थितीत राज्यासह नगर शहरामध्येही राजकीय घडामोडीत मोठा बदल होत आहेत. अखेर हा नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा नेमका कोणत्या घटक पक्षाकडे जातो, यासाठी नगर शहरातील राजकीय पक्षातील कार्यकर्तेमध्ये आजतरी संभ्राम आहे. असे असतानाही नगर शहरात प्रत्येक राजकीय पक्षाकडून चार ते पाच इच्छुकांची संख्या आहे. यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षातून कोण इच्छुक यावरच सगळीकडे उहापोह सुरु असताना, आता नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ.अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे.
नगर जिल्ह्याच्या राजकारण विषयी चर्चा सुुरु झाल्यास तसे आठरे पाटील घरण्याचे नाव आवर्जुन घेतले जाते. यातच काही महिन्यापूर्वी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहे.असे असतानाच काही दिवसांपूर्वी नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. यात नव्याने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार निलेश लंके यांना भेटून त्यांना पुष्पगुच्छ त्यांचे अभिनंदन केले आहे. यात नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे.