नगर -मनमाड महामार्ग दुरुस्ती, कोल्हार पुलाचे कामामुळे जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

नगर -मनमाड महामार्ग दुरुस्ती, कोल्हार पुलाचे कामामुळे जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : मनमाड महामार्गाचे दुरुस्तीचे तसेच कोल्हार येथील पुलाचे कामामुळे अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता अहमदनगर मनमाड या महामार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.
हा आदेश शुक्रवार ८ ते १४ डिसेंबर २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, अहमदनगर यांचे अधिपत्याखाली जय हिंद रोड बिल्डर्स यांचेकडून अहमदनगर मनमाड या महामागांचे पुलदुरुस्तीचे काम सुरु करण्यात आलेलं आहे. परंतु अहमदनगर मनमाड महामार्गावरुन सुरु असलेल्या अवजड वाहतुकीचे वर्दळीमुळे दुरुस्तीचे कामामध्ये व्यत्यय येत आहे. कोल्हार येथील पुलाचे काम करता येत नाही, तसेच कोल्हार पूल हा अवजड वाहनांकरीता धोकादायक झालेला आहे. पूलावर पडलेल्या खड्डयांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पुलाचे दुरुस्तीचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे दुरुस्तीचे काम करणे शक्य होत नाही. त्यातच पुलाचे कामाकरीता वापरण्यात येणा-या मशीन्स उभ्या केल्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचो तसेच पुलाचे कामादरम्यान एखादा अपघात होऊन जिवीत किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अहमदनगर मनमाड महामार्गाचे दुरुस्तीचे तसेच कोल्हार येथील पुलाचे कामामुळे अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता अहमदनगर मनमाड या महामार्गावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे अशी आमची खात्री झाली आहे, यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढलेल्या आदेशामध्ये असे म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात नमुद केलेल्या वेळेकरीता अहमदनगर मनमाड या महामार्गावरील जड वाहतुक खालील मार्गाने वळविणेबाबतचा आदेश जारी करीत आहेत.

⏩> १) अहमदनगरकडुन मनमाडकडे जाणारे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग -⏩

◀️i) विळद वायपास – शेंडी बायपास नेवासा कायगाव- गंगापुर वैजापुर येवलमार्ग – मनमाड कडे किंवा ii) केडगाव वायपास कल्याण बायपास आळेफाटा संगमनेर मार्गे नाशिककडे▶️

◀️➤ शनि शिंगणापुर / सोनाई वरुन राहुरी मार्ग मनमाडकडे जाणारे जड वाहने अहमदनगर छत्रपती संभाजीनगर▶️

महामार्गावरुन इच्छित स्थळी जातील,

◀️➤ देहरे – राहुरी कृषी विदयापिठ, राहुरी कडुन मनमाडकडे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग श्रीरामपुर – बाभळेश्वर – निर्मळ पिंपरी बायपास मार्ग कोपरगाव येवला मनमाडकडे▶️

◀️> २) मनमाड कडुन अहमदनगरकडे येणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग▶️

◀️पुणतांबा फाटा – वैजापुर गंगापुर कायगाव नेवासा शेंडी बायपास विळद बायपास केडगाव बायपास▶️

◀️➤ लोणी / वाभळेश्वर कडून अहमदनगकडे येणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग▶️

◀️वाभळेश्वर – श्रीरामपुर – टाकळीभान नेवासा मार्गे अहमदनगर कडे▶️

◀️➤ ३) मनमाड कडुन अहमदनगर मार्गे पुणे / मुंबई / कल्याणकडे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग▶️

◀️पुणतांबा फाटा – झगडे फाटा सिन्नर नांदुर शिंगोटे संगमनेर आळेफाटा मार्ग▶️

वाहतूक वळविणेबाबतचा आदेश दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी ६ वा. ते दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी १०.वा. राहणार आहे. या आदेश अॅम्ब्युलन्स, अग्नीशामक दल, शासकीय वाहने, रस्ते दुरुस्तीचे कामाकरीता वापरण्यात येणारी वाहने‌ व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणास्तव प्रवेश देण्यात येणारे वाहनांना लागू राहणार नाही, असेही एसपी राकेश ओला यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!