संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील पुणे महामार्गावर कामगाव स्माईलस्टोन हाॅटेलजवळ अपघात कंटनेर, ट्रक व छोटा हत्ती टेम्पो या वाहनांचा विचित्र अपघात झाला. या टेम्पोतील अपघातात चौघे ठार झाले आहेत. तर मयताचे नावे विक्रम राजेंद्र अवचिते, राजेंद्र विष्णु साळवे, धिरज अजय मोहीते, मयुर संतोष साळवे (सर्व रा. आमदाबाद ता. शिरुर जि- पुणे)
जखमीचे नावे ऋतिक किसन साळवे, सतिष शिवाजी साळवे, समाधान श्रावण साळवे, अक्षय किसन साळवे, ओमकार जालिंदर घोडके, गुरुनाथ रावसाहेब साळवे, सोमनाथ बापु बोरगे, सोमनाथ शहाजी साळवे, पोपट संपत घुले, प्रदीप भाऊसाहेब साळवे, प्रेम दत्तात्रय साळवे (सर्व रा. आमदाबाद ता.शिरुर जि-पुणे).

याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे महामार्गावर कंटनेर ट्रक डिव्हडर तोडून जाऊन छोटा हत्ती टेम्पोला जोराची धडक दिली. पिकअप (MH- 12 SF-4526) ही नगर पुणे रोड कामरगाव येथून पुणे कडे जात असतांना यामधील ट्रक क्र- (MH- 12-DG-5448) यावरील चालक याने पुणे कडून नागरकडे येत असताना अचानक डिव्हायडर ओलांडून यामधील पिकअप गाडी ( MH- 12 SF-4526( ला आदळून यानंतर कंटेनर (MH-46 – AF – 0806) याला देखील धडक देछन त्यामधील चालकास गंभीर जखमी करुन गाडीचे नुकसान केलेले आहे. ट्रक ( MH- 12-DG- 5448) वरील चालक याने त्याचे ताब्यातील वाहन अविचाराने हयगईने भरधाव वेगात चालवून रस्ताचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन पुणे-अहमदनगर रोडने चालवित घेवुन येत असताना रस्त्यावरील डिव्हायडर तोडुन रस्त्यावर विरोधी बाजुला येवु पिकअप क्र – ला त्यानंतर कंटेनर (MH-46- AF – 0806) ला जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
