नगर दक्षिण लोकसभा निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात

नगर दक्षिण लोकसभा निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार : निलेश लंके
निलेश लंकेंनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे घेतले आशिर्वाद
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यादेवी नगर लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार आहे, असे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.


अहिल्यादेवी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर निलेश लंके यांनी काँग्रेस नेते माजीमंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे जाऊन त्यांच्या सुदर्शन निवासस्थानी शनिवारी रात्री आमदार श्री थोरात यांची भेट घेतली. श्री. लंके म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मीयता आहे, त्यामध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत, असे त्यांनी आवर्जून म्हणाले.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना त्यांनी सातत्याने मदत केली. सातत्याने विधानसभेत नवीन आमदारांना मदत व मार्गदर्शन करणारे आमदार बाळासाहेब थोरात हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद हा राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आज त्यांच्या भेटीसाठी आल्याचे लंके यांनी सांगितले.


बाळासाहेब थोरात म्हणाले की, निलेश लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम सातत्याने करणारे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे मोठे नाते आहे. नगर दक्षिण मध्ये समोरचे उमेदवार मोठे आहे. मात्र हा लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. हे यश महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचे राहणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके नक्कीच विजय होतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!