संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नगर तालुक्यातील निमगाव वागा व नेप्ती परिसरातील 1 लाख 74 हजार रु किमतीचे 2970 लिटर गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठीचे रसायन जप्त करून तीनजणांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप,पोसई मारग,पोसई बोराडे, एएसआय घोरपडे, पोहेकाॅ खेडकर, पोना राहुल शिंदें,पोना बांगर, पोना वणवे, पोहेकाॅ सोनवणे, जबे, पोना टकले, बोराडे, जाधव, आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे घराचे आडोशाला सुरु असलेल्या गावठी हातभट्टीवर 48 हजार रु ची 800 लिटर दारु तयार करण्याचे कच्चे रसायन पकडले.
पोना राहुल शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपीचे मनोहर टिल्लु पवार (रा पवारवस्ती निमगाव वाघा ता.जि.अहमदनगर ) याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरनं 94/22 महाराष्ट्र प्रोव्हिशन ॲक्ट कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मपोना कुंदे हे करीत आहेत.
घराच्या शेजारी असलेल्या गावठी हातभट्टीवर 54 हजार रु ची 970 लिटर दारु तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त केले. यात पोकाँ विशाल टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुमार दादभाऊ फलके (रा निमगाव वाघा ता.जि.अहमदनगर ) याच्यावर गु.र.नं.व कलम -गुरनं ।।। -95/2022 महाराष्ट्र प्रोव्हिशन अॅक्ट कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ/679 जंबे हे करीत आहेत.
नेप्ती येथे घराच्या आडोशाला चौगुलेवस्ती 72 हजार रु ची 1200 लिटर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन पकडले. याप्रकरणी पोकाँ जयदत्त बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात मारूती छबु चौगुले (रा नेप्ती ता.जि.अहमदनगर ) याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं -गुरनं 95/2022 महाराष्ट्र प्रोव्हिशन अॅक्ट कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.