संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील नेप्ती हद्दीत तीन गावठी हातभट्ट्यावर नगर तालुका पोलिसांनी शनिवारी (दि.६) छापे टाकून उध्वस्त करण्यात आल्या. या छाप्यात तिघांवर कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्यांची नावे याप्रमाणे महेश अनिल पवार, विशाल मनोहर पवार, दिलीप नाथू पवार ( सर्व रा.नेप्ती) अशी आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की,नेप्ती हद्दीत तीन गावठी हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात आल्या. या कारवाई मध्ये ८८ हजार रुपये किमतीचे ११०० लिटर गावठी हातभट्टी चे कच्चे रसायन व ५ हजार रुपये किमतीची ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जागीच नष्ट करण्यात आली. आहे. असा एकूण ९३ हजार रुपये किमतीचा प्रोव्हिसन गुन्ह्याचा मुद्द्यामाल व रसायनाची प्लॅस्टिक टिपाड व बॅरल व ड्रम जागीच नष्ट करण्यात आले.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोस्टचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोउपनि रंजीत मारग, पोकाॅ विक्रांत भालसिंग, कमलेश पाथरुट, जयदत्त बांगर,चालक विकास शिंदे, मपोना फुंदे यांच्या टिम’ने कारवाई केली आहे.