संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील वाळकी येथील गारवा हॉटेलवर छापा टाकून अवैद्य विदेशी दारु जप्त करण्याची कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ सुभाष थोरात, वणवे पोकाॅ. कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
नगर तालुका पोलिस टिम हद्दीमध्ये अवैध धंद्यावर पेट्रोलींग करीत असतांना सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, वाळकी गावामध्ये गारवा हॉटेल येथे एकजण बेकायदेशीर विदेशी दारुची मोठयाप्रमाणात विक्री करीत आहे.
या माहितीनुसार नगर तालुका पोलीस व पंचाची खात्री पटताच विदेशी दारुची विक्री करण्याऱ्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रविद्र शिवाजी गोरे (रा. वाळकी ता. जिल्हा अ.नगर) असे असल्याचे सांगितले. त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्जेमध्ये एकुण १४ हजार ८५० रुपयेचा विविध कंपनीच्या विदेश दारुच्या बाटल्या मिळून आल्या. या घटनेबाबत पोकाॅ कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुरंन ३९९ / २०२३ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.