संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : Nagar Taka police नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत खंडाळा व नेप्ती रानमळा गावच्या शिवारात गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार नगर पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यामध्ये बाळू उर्फ बाळासाहेब नाथा जपकर (रा. नेप्ती ता. जि अहमदनगर, पोपट गिरधारी गिरे (रा. खंडाळा ता.जि. अहमदनगर व एका महिलेविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाई दरम्यान ३ गावठी हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. यात २ लाख २४ हजार किंमतीचे २ हजार ८०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व ८ हजार ५०० रुपये किंमतीची ८५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जागीच नष्ट करण्यात आली. रसायनाची प्लॅस्टिक टिपाड व बॅरल व ड्रमही जागीच नष्ट करण्यात आले.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोउपनि रणजीत मारग, पोलीस अंमलदार एएसआय भरत धुमाळ, पोना राहुल शिंदे, योगेश ठाणगे, संभाजी बोराडे विक्रांत भालसिंग, विशाल टकले आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.