संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :- अहमदनगर जिल्हयातील हागणदारीमुक्तीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अतंर्गत ग्रामिण भागात 219 सार्वजनिक शौचालयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. धार्मिकस्थळ,बाजारतळ, पर्यटनस्थळ, सार्वजनिक ठिकाणे व इतर गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता मध्ये सातत्य रहावे या दृष्टीकोनातून सार्वजनिक शौचालय मंजूर केले असून आज रोजी 139 शौचालय पुर्ण झाले असून 80 ठिकाणी काम सुरु असल्याचे माहिती राजेंद्र क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,अहमदनगर यांनी दिली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अतंर्गत वैयक्तीक व सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात असून सन 2021-22 च्या आर्थिक वर्षात 219 सार्वजनिक शौचालनयांना प्रत्येकी 3.00 लक्ष निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यात सार्वाधिक पारनेर तालुक्यात 38 ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली जाणार आहे. जिल्हयात 219 सार्वजनिक शौचालय पैकी अकोले-21, कर्जत-12, कोपरगांव-14, नगर-10, नेवासा-12, पाथर्डी-20, राहुरी-10, राहता-19, संगमनेर-18, शेवगांव-9, श्रीगोंदा-14, श्रीरामपुर-22 अशा 219 सार्वजनिक शौचालयांना मंजुरी देण्यात आलेली असून वरीलप्रमाणे गर्दीचे ठिकाणी जिल्ह्यात सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता असल्यास व तसा ग्रामपंचायतीने पंचायत समिती ला प्रस्ताव सादर केल्यास त्यास मंजुरी दिली जाईल असे राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
जिल्हयातील उर्वरीत प्रगतीपथावरील 80 सार्वजनिक शौचालये लवकरात-लवकर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सुरेश शिंदे प्रकल्प संचालक,जल जीवन मिशन जिल्हा परिषद,अहमदनगर यांनी सांगितले.