संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार व कोपरगांव तालुका येथील वेगवेगळ्या दोन ठिकाणी राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्यास पकडले. या कारवाईत २ लाख ६३ हजार २०३ रु.किंचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके, व कर्जत डिवायएसपी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना सचिन आडबल, संतोष लोढे, संदीप चव्हाण, पोकॉ शिवाजी ढाकणे, आकाश काळे, रोहित मिसाळ, सागर ससाणे, रणजीत जाधव व मपोकॉ ज्योती शिंदे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने भिंगार व कोपरगांव तालुका पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करुन अवैधरित्या गुटखा व पानमसाला विक्री करणा-या दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात एकुण २ लाख ६३ हजार २०३ रुपये किंमतीचा विमल, रजनीगंधा, व्हि-१ टोबॅको, चैनी, मिराज, रॉयल ७१७ तंबाखु, गुटखा, पानमसाला व एक ऍ़क्टीव्हा असा मुद्देमाल जप्त करुन खालील प्रमाणे ४ आरोपींविरुध्द भिंगार कॅम्प व कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलमान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आयुब शेरु शेख (वय ३२, रा. अलमगिर, भिंगार, ता. नगर ) याला पकडून त्याच्याकडून १ लाख ६ हजार ८३ रुपये किंमतीचा विमल, रजनीगंधा, व्हि-१ टोबॅको, चैनी, मिराज, रॉयल ७१७ तंबाखु, गुटखा व पानमसाला जप्त केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गु.र.नं. २४१/२३ भादविक ३२८, १८८, २७२, २७३, गुन्हा दाखल केला तर शुभम राजेंद्र घोडेराव (वय २२), अभिषेक उदयनारायण सिंग (वय २१ दोन्ही रा. टाकळीनाका, ता. कोपरगांव) वसीम पटेल (रा. संभाजीनगर) या तिघांना पकडले. याच्याकडून १ लाख ५७ हजार १२० रुपये किंमतीचा विमल, रजनीगंधा, व्हि-१ टोबॅको, चैनी, मिराज, रॉयल ७१७ तंबाखु, गुटखा, पानमसाला व एक ऍ़क्टीव्हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांवर कोपरगांव शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. २००/३४ भादविक ३२८, १८८, २७२, २७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.