संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शहरातील कल्याण रस्त्यावरील गणेश मंदिर स्वामी समर्थ कॉलनी पेट्रोल पंपासमोर श्री संत भगवानबाबा व संत वामनभाऊ संयुक्त पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला.
दरम्यान पुण्यतिथी सोहळ्यात रविंद्र महाराज आव्हाड वडुलेकर यांचे कीर्तन झाले. यावेळी विठ्ठल महाराज फलके नवनाथ वारकरी शिक्षण संस्था व बाल गोपाळ, पर्जणेश्वर महिला भजनी मंडळाने दिंडीत सहभाग घेतला होता.
यावेळी सोहळ्यास जिल्हा न्यायाधीश मिलींद कुर्तडीकर, नगरसेवक सचिन शिंदे, श्यामआप्पा नळकांडे व अजय चितळे, युवराज शिंदे, दत्ता वामन, विजू गाडळकर, पारुनाथ ढोकळे, राजू वामन, पत्रकार राजू खरपुडे, दै.नगर दवंडीचे संपादक राम नळकांडे आदिंसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण रोड परिसरातील बहुसंख्य भाविक , उपस्थित होते. या प्रसंगी दिंडी सोहळा कीर्तन सेवा,महाआरती महाप्रसाद व उपस्थित मान्यवराचा सत्कार सोहळा संत भगवानबाबा व संत वामनभाऊ उसत्व कमेटी नगर कल्याण रोड याच्या वतीने सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवानबाबा व वामनभाऊ उसत्व कमिटीने परिश्रम घेतले.