नगरात चैन स्नॅचिंग करणारा चोरटा अंबिवलीत पकडला; एलसीबी टिम’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अंबिवली येथे अहमदनगर शहरामध्ये चैन स्नॅचिंग करणारा चोरटा अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडला. मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी (वय ३०, रा. अंबिवली, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, पोहेकॉ सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, फुरकान शेख, पोकॉ अमृत आढाव आदिंच्या टिम’ने कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना पकडा, असा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने घटना ठिकाणचे आजुबाजूचे सीसीसीटीव्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीताचे नांव मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी (रा. अंबिवली, कल्याण) हा असल्याचे निष्पन्न झाला. त्या आरोपीचा दि.४ डिसेंबर २०२३ रोजी अंबिवली, कल्याण या ठिकाणी जाऊन शोध घेऊन ताब्यात घेण्यासाठी जात असतांना आरोपीने पोलीसांना पाहुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता आरोपीचे नातेवाईक महिलांनी आरोपीस पोलीस पथकाचे तावडीमधून सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसाने आरोपीस त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यातून सोडून घेऊन स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहमदनगर येथे आणण्यात आले. त्यास त्याचे पूर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी (वय ३०, रा. अंबिवली, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे) असे असल्याचे सांगितले. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार अज्जु (पूर्ण नांव गांव माहित नाही) याच्यासोबत त्यांच्याकडील बजाज कंपनीचे पल्सर एन. एस. दुचाकीवर येऊन अहमदनगर शहरामध्ये व श्रीरामपूर या ठिकाणी गंठण चोरी केल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने गुन्ह्यातील बळजबरीने चोरी केलेले सोन्याचे दागिन्याची त्याची आई सिमा अण्णु सय्यद उर्फ इराणी व बहीण रेश्मा अण्णु इराणी उर्फ सय्यद (दोन्ही रा. अंबिवली, कल्याण) याच्या मार्फतीने विक्री केले असल्याचे सांगितले. आरोपीचे कब्जामध्ये गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीतून आलेले ९ हजार ७०० रुपये मिळून आल्याने ते ताब्यात घेऊन आरोपीस तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.