नगरमध्ये डॉ. सुजय विखे पा. मोठ्या मताधिक्याने निवडून येणार : वसंत लोढा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नगर शहरात कोणाच्या नावाची चर्चा आहे, कोण बाजी मारेल याबद्दल वसंत लोढा यांनी माहिती दिली आहे.
वसंत लोढा यांनी सांगितले की, नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे. कारण एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील कामाचा प्रभाव खासदारांना निवडून आणण्यास कारणीभूत ठरेल. शिवाय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगवेगळ्या वार्डात, वेगवेगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून केलेली विकासकामे देखील त्यांना मदत करणारी ठरतील.

डॉ. सुजय विखेंनी खासदार निधी व इतर निधीतून प्रत्येक भागात आणून जो काही विकास साधला आहे. जे महानगरपालिका करू शकली नाही, ती नगर शहरातली विकासकामे खासदारांच्या माध्यमातून, पीडब्लूडीच्या माध्यमातून डॉ. सुजय विखेंनी मार्गी लावलेली आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे नगर शहरात असलेले नेटवर्क, पक्षाचे काम, संघ परिवाराचे काम या सर्व गोष्टींचा विचार केला तर नगर शहर मोठ्या प्रमाणात हिंदुत्व मानणारे शहर म्हणून नावारूपास आले आहे.
याच अनुषंगाने उदाहरण द्यायचे झाले तर, गेल्या पंधरा दिवसांपासून नगर शहरामध्ये हनुमान चालीसाचे दररोज पाच-पाच कार्यक्रम विविध भागात संपन्न होत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागातील सुमारे पंधरा हजार नागरिक एकत्र येत आहेत. तसेच प्रभू रामचंद्राच्या मंदिराची उभारणी असेल, कलम 370 रद्द करणे असेल, तसेच येणार्‍या काळामध्ये देशाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे विषय आहेत, ते फक्त मोदींच्याच माध्यमातून सोडवले जाऊ शकतात असा विश्वास नगरवासीयांना आहे. समान नागरी कायदा असेल किंवा इतर विषय असतील त्यांच्या मार्फत देशातील हिंदुत्वाला जोडून ठेवण्याचे काम गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींच्या काळात झालेले आहे. त्याचा एक चांगला परिणाम निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल, असे मत वसंत लोढा यांनी मांडले.
तसेच ते पुढे म्हणाले की, फक्त हिंदू एकत्र येणे हा भाजपाचा उद्देश नसून केंद्र सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना राबविलेल्या आहेत, त्या योजना कुठलाही भेदभाव न करता सर्व धर्मीयांना कसा लाभ मिळेल याचा विचार करण्यात आला आहे. ’हम सब एक है’, ’सबका विकास देश का विकास’ या भावनेतून मोदीजींनी ज्या काही योजना राबविल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत, सर्व समाजापर्यंत पोहोचल्या आहेत. त्याचा फार मोठा परिणाम लोकांवर झालेला आहे.
पंतप्रधान मोदीजींकडे बघून आज असे वातावरण निर्माण झाले आहे की, मोदीजी हे कोणत्या धर्माचे नसून ते देशाच्या कल्याणासाठी असलेले एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, त्याचा मोठा परिणाम समाजावर झालेला आहे. विशेष म्हणजे या विकासामुळे आज मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ उतरला आहे. त्यामुळे नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने मागच्या वेळेस खासदार डॉ. सुजय विखे यांना लीड मिळाले होते. माझ्या दृष्टिकोनातून त्याच्यापेक्षा जास्त लीड भाजपाचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना शंभर टक्के आम्ही मिळवून देऊ असे मत त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!