नगरच्या हनीट्रॅप प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
संग्राम सत्तेचा
अहमदनगर- नगर तालुक्यातील बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले असून, या प्रकरणात हिंगणगावचा व्यावसायिक व रेकॉर्डवरील गुन्हेगार बापू सोनवणे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सोनवणे हा हायप्रोफाईल लोकांची नावे संबंधित महिलेला सूचवित होता. त्यानुसार सदर महिला संबंधितांना जाळ्यात ओढत होती. पोलिसांनी सोनवणे याच्या मुसक्या आवळतानाच त्याची आलिशान फॉरच्युनर गाडीदेखील जप्त केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे.
जखणगाव शेजारील एका प्रतिष्ठीत गावच्या नागरिकाशी शरीरसंबंध ठेऊन, त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय महिलेसह एकास पोलिसांनी आधीच अटक कली आहे. या महिलेला हायप्रोफाईल लोकांची नावे सूचविणारा तिसरा आरोपी बापू सोनवणे याला गुरुवारी तालुका पोलिसांनी जेरबंद करत, त्याचा कसून तपास सुरु केला आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहितीसुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहे.
नगरमधील बहुचर्चित हनीट्रॅपमध्ये बाळ बोठे या कथीत पत्रकाराच्या संपर्कात जखणगाव येथील ही कथीत महिला संपर्कात होती. याच महिलेशी बोठे याची जवळीक होती आणि त्यातूनच रेखा जरे आणि बोठे यांची अनेकदा भांडणे झाल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे जखणगाव येथील ही कथीत महिला हनीट्रॅप अनेक वर्षांपासून करत असल्याचेही समोर आले आहे. याच महिलेच्या संपर्कातून अनेकांचा ट्रॅप करण्यात आला.