‘ध्येय मल्टिस्टेट’चे चेअरमन, व्हा.चेअरमन, सीईओचा पोलिसांनी शोध लावावा ः 112 ठेवीदारांची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्ह्यात ध्येय मल्टिस्टेट निधी लि.या पतसंस्थेचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे, व्हा.चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे, संचालक तथा सीईओ राहुल बबन कराळे यांनी अनेक ठिकाणी असणार्‍या वेगवेगळ्या शांखामध्ये 112 ठेवीदारांची 5 कोटी 78 लाख 65 हजार 90 रुपयांची रक्कम घेतली. त्याबदल्यात मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून व यानंतर संबंधित ठेवीदारांना कोणत्याही प्रकाराचा परतावा दिला नाही. ठेवीदार ठेवीची मु्द्दल रक्कम मागण्यास गेले असता, ठेवीदारांना काही दिवस टाळाटाळा करीत अक्षरशः मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. यात अनेकांनी नोकरीतून अथवा धंद्यातून कामवलेली रक्कम अडकली आहे. त्यामुळेच ‘ध्येय’चे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक तथा सीईओ यांना पोलिस प्रशासनाने तातडीने अटक करून ठेवींची रक्कमा मिळाव्यात, अशी मागणी ध्येय मल्टिस्टेट निधी लि.या पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मागणी केली आहे.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक करणारे मुख्य सूत्रधार चेअरमन विशाल भागानगरे, व्हाईस चेअरमन रोहिदास कवडे, संचालक व सीईओ राहुल कराळे हे तिघे 9 महिन्यांचा कालावधी उलटला तरी पोलिसांना सापडलेले नाहीत. आता या गुन्ह्याचा तपास थंडावल्याने ठेवीदार झाले हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सर्व शाखा बंद करून तब्बल 112 ठेवीदारांना 5 कोटी 78 लाख 65 हजार रुपयांची टोपी घालण्यात आली आहे. या फसवणूक झालेल्या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा.शिंदेमळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह 7 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दि.16 मे 2024 रोजी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडेमळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गुन्हा दाखल झाल्यापासून 9 महिन्यात यातील पुजा विलास रावते व विलास नामदेव रावत (दघि, रा. बोरूडेमळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या 9 महिन्यात यातील एकालाही पोलिसांनी अटक केलेली नाही

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!