शिवाजीनगर येथे बालाजी उत्सवानिमित्त पद्मश्री पोपटराव पवार यांची लाडूतुला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – कल्याण रोड परिसरात वसाहती वाढत आहे, नगरसेवकांच्या प्रयत्नातून त्यांना मुलभुत सुविधा मिळत आहेत. त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून समाज जोडण्याचे काम उत्सवाच्या माध्यमातून होत आहे. या धार्मिक कार्याला सामाजिकतेची जोड देऊन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होत आहे. या कार्यक्रमात राज्याचे भुषण असलेले पद्मश्री पोपटराव पवार यांची लाडू तुला करुन त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. समाजात चांगले काम करणार्या व्यक्तींना प्रोत्साहन दिल्यास त्यांना प्रेरणा मिळत असते, ते नेहमीच समाजासाठी मार्गदर्शक राहतील, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे बालाजी उत्सवानिमित्त पद्मश्री पोपटराव पवार यांची लाडू तुला करण्यात आली. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक अनिल शिंदे, शाम नळकांडे, राम नळकांडे, गणेश कवडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, अनिल बोरुडे, पारुनाथ ढोकळे, उत्तमराव राजळे, भगवान काटे, खासेराव शितोळे, सुनिल शिंदे, अंकुश साबळे, संजय शेळके, अमोल बनकर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शाम नळकांडे यांनी सांगितले, कल्याण रोड परिसरात लोकवस्ती वाढत आहेत, या लोकवस्तीत बांधण्यात आलेल्या बालाजी, विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या माध्यमातून धार्मिक उत्सव साजरे होत असतात. बालाजी, विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या वर्धापनदिन नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबरच नेत्र तपासणी शिबीर, पद्मश्री पोपटराव पवार यांची लाडू तुला आदि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी पोपटराव पवार म्हणाले, समाज एकत्र आला की, कितीही मोठे कार्य असले तरी ते लहान होऊन जाते. एकत्रित सहभाग असल्याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो. धार्मिक कार्याबरोबरच आरोग्य, शिक्षण अशा आवश्यक गोष्टींचाही समावेश करुन जनसेवेचे व्रत उत्सव समितीने जपले आहे. अशा उपक्रमातील मान्यवरांची उपस्थिती परिसराच्या विकासात भर घालणारी ठरणारी असल्याचे सांगितले.
या उत्सवानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले, यामध्ये बालाजी व विठ्ठल-रुख्मिणी अभिषेक, आरती, मोतीबिंदू व नेत्रतपासणी शिबीर, पद्मश्री लाडू तुला व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास नगरमधील मान्यवर तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार राम नळकांडे यांनी मानले. यावेळी आघाव गुरुजी, सुशांत शिंदे, सुरेश आधारे, अमोल बागल, प्रकाश कोटा, ऋषी सामल, रामा गुंडू, मिलिंद गुंजाळ, प्रविण लोखंडे, सागर कोडम, गणेश कोडम, अतुल भोसले, सतीश नळकांडे, संतोष शियाळ, सागर गुंजाळ, सुबोध कुलकर्णी, रवी बागडे, जालू तापकिरे, मच्छिंद्र चौकटे, गणेश लयचेट्टी, राजकुमार कटारिया आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शंभुराजे प्रतिष्ठान, शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ, नवग्रह प्रतिष्ठान, शाम नळकांडे मित्र मंडळ व परिसरातील नागरिकांनी केले.