दोन गावठी कट्टयासह एक जेरबंद ; तोफखाना पोलीसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : विक्रीस आणलेल्या दोन गावठी कट्टयासह एकास तोफखाना पोलीसांनी ताब्यात घेतले. करण कृष्णा फसले (वय ३०, रा. खिस्त गल्ली, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि आंनद कोकरे यांच्या सूचनेनुसार पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ भानुदास खेडकर पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ अहमद इनामदार, पोहेकॉ सुधीर खाडे, पोना वसीम पठाण, पोना संदिप धामणे, पोकाॅ सुमीत गवळी, पो.कॉ. शिरीष तरटे, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ सतीष भवर, पोकॉ सतीष त्रिभुवन, पोकाॅ बाळासाहेब भापसे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत गंगाउदयानचे भिंतीलगत दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी ६.१५ वाजण्याच्या सुमारास एकजण गावठी कट्टे घेऊन विक्री करण्याकरीता येत असल्याची तोफखाना पोनि. आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहीतीवरुन करण कृष्णा फसले ( रा. खिस्तगल्ली, अहमदनगर) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्जातून ४० हजार रु किंमतीचे दोन गावठी कट्टे (पिस्तोल) हस्तगत केले. याबाबत पोहेकॉ भानुदास खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गु र नं १२९/२०२४ आर्म ऍक्ट कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई सचिन रणशेवरे हे करत आहेत.