घटनेमध्ये दोघे जखमी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरेगावच्या यात्रेत कोयत्याने वार करून दहशत निर्माण करणाऱ्या त्या दोघांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांची टिम पाठवून पकडून अटक केले. आकाश शिवाजी जाधव (रा देहरे ता जि अ नगर) त्याच्या सोबतचा एक अनोळखी पाहुणा ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) अशी पकडण्यात आलेली आहेत. या घटनेत ऋषीकेश संजय लांडगे, विशाल ज्ञानदेव करांडे ही दोघे जखमी झाले असून, या दोघांना उपचारासाठी अहमदनगर शहरातील साई माऊली हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हकीगत नगर तालुक्यातील देहरे येथे मंगळवारी (दि.७ मार्च) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास देवाच्या वार्षिक याञा महोत्सवामध्ये रेल्वे टपरीजवळ रस्त्यावर घड्याळ विक्री करण्यासाठी आलेल्यास आकाश शिवाजी जाधव हा त्याच्यासोबत आलेला त्याचा एक अनोळखी पाहुणा (नाव पत्ता माहित नाही) हे दम देत होते. यावेळी त्यांना माझा पुतण्या व विशाल करंडे यांनी त्यांना तुम्ही घड्याळ विक्री करुन पोट भरण्यासाठी आलेल्या घड्याळ विक्रेत्यास का दम देत आहात, असे विचारल्याच्या कारणावरुन आकाश शिवाजी जाधव (रा देहरे ता जि अ नगर) याने व त्याचा एक अनोळखी पाहुणा (नाव पत्ता माहित नाही) यांनी शिवीगाळ करुन तेथे याञेत शेती उपयोगी खुरपे ,कोयता, कुदळ असे वस्तू विक्रीसाठी आणलेल्या व विक्रीसाठी ठेवलेल्या त्यासंबंधितच्या कोयता व कुदळ हातात घेऊन माझा पुतण्या ऋषीकेश लांडगे याला कुदळीने उजव्या हातावर,तर आकाश याच्यासोबत आलेल्या अनोळखी पाहुण्याने व पुतण्याचा मिञ विशाल करंडे यास आकाश जाधव याने कोयत्याने पाठीवर वार करुन दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे., या राजेंद्र शिवाजी लांडगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनं व कलम गुरनं १९३/२०२३ भा.द.वी कलम ३०७,५०४,३४ आर्म अँक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
नगर तालुका डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोसई श्री हंडाळ हे पुढील तपास करीत आहेत.