देशभक्ती व सामाजिक प्रबोधनात्मक कवितांनी गणेश फेस्टिव्हलच्या मुशायराने वाहऽ वाहऽ मिळविली

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Networking
अहमदनगर –
अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व इकरास् पी.ए.इनामदार स्कूल नगर व्यासपीठच्यावतीने गणेशोत्सवातील अहमदनगर महोत्सवात ऑल इंडिया मुशायर्याचे मुस्लिम बँकेच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला नगर महोत्सवचे संस्थापक संयोजक स्व.सुधीर मेहता व प्रेसफोटोग्राफर जितेंद्र अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. निजामाबाद येथील मौलाना कादीर तमिम निजामाबादी यांच्या नाअत पठणाने मुशायर्‍यास प्रारंभ झाला.

पुण्याच्या मुस्लिम बँक व राज वेलनेस सेंटर, फर्स्ट इंप्रेशन व ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर अहमदनगर च्या सहकार्यानेे आयोजित ऑल इंडिया मुशायर्याच्या अध्यक्षस्थानी बुरहानपुर चे कवि नईम राशिद हे होते. यावेळी नाशिक विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषदेचे शेख मन्सुर अजीज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुस्लिम बँकेचे स्थानिक संचालक इंजि. इकबाल सय्यद, मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर , इंजिनियर आर्किटेक्ट अ‍ॅड सर्व्हेअर असोसिएशनचे अध्यक्ष शेख अन्वर सरदार,ऑल इंडिया हज अ‍ॅड उमरा टुर्स ऑर्गनाइजेशनचे चेअरमन हाजी शौकत भाई तांबोली, ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर अहमदनगरचे अध्यक्ष सय्यद शाह निज़ाम, अहमदनगर महोत्सवाचे संयोजिका डॉ.कमर सुरुर, नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट चे अध्यक्ष युनूस भाई तांबटकर, नगरसेवक समद खान, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शरफुद्दीन सर, सामाजिक कार्यकर्तेराजूभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.नुसरत मेहंदी यांच्या राष्ट्रीय एकात्मतेवर – ‘हर तरफ मेहकी हुई मेरे चमन की खुशबु… है फजाओं में अजानों की भजन की खुशबु… मुझको विरसे में मिली गंगो जमन की खुशबु…. मेरी हर सांस में बसती है, वतन की खुशबु..
या कवितेने मुशायरा जिंकून टाकला. लोकांना विचार करायला लावणारी कविता सादर करुन प्रेक्षकांची वाऽह.. वाह मिळविली. बंगेलरचे शफीक आबदी यांनी आपली कविता सादर करतांना म्हणाले की…. सियासत जित सकती है… ना दौलत जित सकती है… दिलों को अहले नफरत की मोहब्बत जित सकती है…. या रचनेद्वारे भडक राजकारण, पैसा हा माणसांना लांब करतो, त्यांना फक्त प्रेमानेच अशा लोकांची मने जिंकता येऊ शकते हा संदेश देण्याचा कार्य केले.
बुर्‍हाणपुर येथील नईम रशिद यांनी आपली कविता सादर करतांना ज्येष्ठांच्या अनुभवाचे बोल या विचारांचा अनादर करणार्‍या पिढीसाठी संदेश देतांना म्हणाले…. मैने टोका बहोत मैंने रोका बहुत.. फिर भी तुमने मेरी बात मानी नही… शायरी दर हकिकत नही शायरी… जिस में हालात की तरजुमानी नही….
दिल्ली येथील हास्य कवी अहमद अल्वी यांनी आपल्या कवितेने उपस्थितांना हास्य विनोदाने लोळपोळ केले तर स्थानिक कवियत्री व अहमदनगर महोत्सवाच्या संयोजिका डॉ.कमर सुरुर यांनी ‘नफरत तेरी साँसो की सब, कट जायेंगी डोर… प्यार मोहब्बत का ही मंजर होगा चारो ओर, बस दिल की ऑखोंसे पढलो गीता और कुरआण.. आओ हिंदूस्तान बनाये, ऐसा हिंदुस्तान… या देशभक्तीपर कविता सादर क़रुन वाऽह वाह… मिळविली.
या व्यतिरिक्त या मुशायर्‍यां मध्ये आसिफ सर,खलील सय्यद, सलीम यावर व बिलाल अहमदनगरी आदि कविंनी आपल्या रचना सादर करुन गजल रसिकांची मने जिंकली.
देशभक्त, शहीदांचे बलिदान, राष्ट्रीय एकात्मता, जीवघेणी महागाई, हिंसाचारात निरापराधांचा मृत्यू, इन्सानियत मानवतेच्या विरोधात सूरु असलेल्या कारवाया आणि असंवेदनशिल राज्यकर्तेसामान्यांच्या मनात खदखदत असलेल्या अशा देश हिताच्या गंभीर विषयांवर देशाच्या विविध भागातुन आलेल्या शायरांनी आपल्या प्रभावी आणि भेदक रचना सादर करत होते. आणि संपुर्ण सभागृह या शायरीला तितकीच दिलखुलास आणि अंत:करणपूर्वक दाद देत होते. वाह..वाह… बहोत खुब…. दोबारा… मुकरर्र… जियो… जिंदाबाद…. अशा प्रतिसादात नगर शहरात आयोजित राष्ट्रीय कवि संमेलन अर्थात ऑल इंडिया मुशायरा रंगत गेला. एकेक शायरची रचना सादर होत होती आणि सभागृह अंतर्मुख होत होते.
या मुशायराने खर्या अर्थाने इतिहास घडवित एकतेचे दर्शन घडविल्याचे मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तवकि डॉ.कमर सुरुर यांनी केले, सूत्रसंचालन शफकत सय्यद यांनी केले तर बिलाल खान यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद, नगर व्यासपीठ, मखदूम सोसायटीचे सर्व पदाधिारी व सदस्य तसेच शफाकत सय्यद, खान मखदुम, तनवीर चष्मावाला, शेख नईम सरदार, आरिफ सय्यद, शेख जावेद महेमूद, अमजद पठान, जावेद तांबोळी,शेरअली शेख, तौफिक तांबोली,शाहीद भाई,राजा भैया, शाहनवाज़ तांबोली आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!