सुदर्शन चॅनेलचे प्रमुख सुरेशजी चव्हाणके यांच्या हस्ते श्री विशाल गणेशाची आरती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – प्रत्येक देवस्थान हे आपल्या हिंदू संस्कृतीत प्रेरणास्थान राहिले आहे, त्यामुळे या देवस्थानांचा विकास झाला पाहिजे. हिंदू संस्कृती रक्षणासाठी ही आवश्यकता बनली आहे. देवस्थानच्या माध्यमातून धार्मिकता वाढीस मदत होत असते. अशा देवस्थानांची महती आणि प्रचित सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम सुदर्शन चॅनेलच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे त्या तिर्थक्षेत्राचे महत्व सर्वांपर्यंत पोहचत आहे. त्या माध्यमातून संस्कृती रक्षणाचे कार्य सुरु आहे. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची भव्य मूर्तीच्या दर्शनाने आत्मिक समाधान लाभते. मंदिराचा झालेला विकास नेत्रदिपक असाच आहे. प्रत्येक देवस्थानाचा सर्वांगिण विकासासाठी समस्त भाविकांनी योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुदर्शन चॅनेलचे प्रमुख सुरेशजी चव्हाणके यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे सुदर्शन चॅनेलचे प्रमुख सुरेशजी चव्हाणके यांनी भेट दिली असता, त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक, सुनिल घनवट, श्रीकांत रांजणकर, जयवंत जाधव, सुमित मिश्रा, डॉ.पवन आर्य, रागिनी तिवारी, देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, संजय चाफे, नितीन पुंड आदिंसह वसंत लोढा, दिलीप सातपुते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक योगीराज गाडे, रविंद्र बारस्कर, सुधीर लांडगे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अॅड.अभय आगरकर म्हणाले, सुदर्शन चॅनेलच्या माध्यमातून देशभरातील विविध देवस्थान आणि त्याचे महत्व सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम होत आहे. आपली संस्कृती व अनमोल ठेवा जगभर पोहचविण्याचे काम सुदर्शन चॅनेलच्या माध्यमातून सुरेशजी चव्हाणके करत आहे. असे सांगून श्री विशाल देवस्थानच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी देवस्थानच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा श्री विशाल गणेशाची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. विश्वस्त नितीन पुंड यांनी प्रास्तविक केले. संजय चाफे यांनी सर्वांचे आभार मानले.